Saarthi Honorarium Hike: ‘सारथी’तील बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना मानधनवाढीची प्रतीक्षा; ३ वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित

‘बार्टी’, ‘महाज्योती’, ‘टीआरटीआय’मध्ये ४५ ते ५३ टक्के मानधनवाढ; समान काम करूनही ‘सारथी’तील बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपासून वाढीची प्रतीक्षा, प्रस्ताव लालफितीत अडकले
Sarthi Scholarship

“SARTHI outsourced employees await a long-pending honorarium hike as pay disparities persist with BARTI, MAHAJYOTI and TRTI.

sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : काम समान, जबाबदारी समान ; मात्र मानधनात मोठी तफावत अशी स्थिती ‘सारथी’तील बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांची झाली आहे. ‘बार्टी’, ‘महाज्योती’ आणि ‘टीआरटीआय’ यांसारख्या समांतर संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या मानधनात आत्तापर्यंत ४५ ते ५३ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. मात्र, याच धर्तीवर काम करणाऱ्या ‘सारथी’चे कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून मानधनवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारच्या लालफितीच्या कारभारात अडकला असून मानधनात होत असलेल्या या दुजाभावामुळे ‘सारथी’च्या कर्मचाऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com