सारथी संस्थेला स्वायत्तता देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासमवेत शनिवारी सरकारी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
Ajit Pawar
Ajit PawarSakal

पुणे - छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला (Sarathi Organization) गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासोबतच विविध उपक्रम राबविण्यासाठी निधी (Fund) देण्यात येइल. तसेच, सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. (Sarathi will give Autonomy to the Organization Ajit Pawar Announcing)

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासमवेत शनिवारी सरकारी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ‘सारथी’चे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ या वेळी उपस्थित होते.

Ajit Pawar
राष्ट्रवादीत नव्या कार्यकर्त्यांना मिळणार संधी - अजित पवार

पवार म्हणाले, ‘सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. ‘सारथी’चे सबलीकरण आणि विविध उपक्रमांसाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. ‘सारथी’ची आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्यात येणार असून, पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे जुलै महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील शैक्षणिकदृष्टया महत्वाच्या शहरात ‘सारथी’मार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी वसतिगृह सुरु करण्यात येतील. ‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल. सारथी संस्थेने पुढील तीन वर्षाचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा. यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित कराव्यात.’

‘सारथी’च्या बंद उपक्रमांसह काही उपक्रम सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. त्यांना मान्यता घेवून उपक्रम सुरु करण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये ‘सारथी’च्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येणार आहे. तारादूत प्रकल्पही सुरु करण्यात येणार आहे. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी ‘सारथी’ने प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘सारथी’ला स्वायत्तता आणि निधीसह विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील बहुतांश मागण्यांवर पवार यांनी तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल खासदार संभाजीराजे यांनी समाधान व्यक्त केले.

Ajit Pawar
ॲक्शन घ्यायला सांगतो! गर्दीबद्दल अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

- ‘सारथी’ला विविध उपक्रम राबविण्यासाठी निधी देणार

- ‘सारथी’ची आठ विभागीय कार्यालये आणि एक उपकेंद्र सुरु करणार

- पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरु होणार

- शैक्षणिकदृष्टया महत्त्वाच्या शहरात 'सारथी'मार्फत वसतिगृह

- तारादूत प्रकल्प सुरु करणार

- गरजू मराठा तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com