esakal | राष्ट्रवादीत नव्या कार्यकर्त्यांना मिळणार संधी - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

राष्ट्रवादीत नव्या कार्यकर्त्यांना मिळणार संधी - अजित पवार

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील -सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी वर्षात पुणे महापालिकेची निवडणूक होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार असल्याचे स्पष्ट केले. "पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. गटातटाचे राजकारण करू नका, वाद घालू नका. या नव्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान राखा, नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या माना खाली जाणार नाहीत, असे कोणतेही कृत्य करू नका. हे कार्यालय पुणे शहराच्या राजकीय, सांस्कृतीक विकासाचे केंद्र बनले पाहिजे," असा सल्ला अजित पवार यांनी दिला. डेंगळे पूल येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगातप, खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. (New workers will get opportunity in NCP says Ajit Pawar)

हेही वाचा: वयोवृद्ध कैद्यांच्या सुटकेसाठी मेधा पाटकरांची सुप्रीम कोर्टात याचिका

अजित पवार म्हणाले, ‘‘नवे कार्यालय उभे करण्यासाठी पक्षातील कार्यकर्ते आपआपल्यापरीने मदत करत आहेत. गेले आठरा वर्ष राष्ट्रवादीचे कार्यालय टिळक रस्त्यावरील गिरे बंगल्यात होते. पण त्यांनी कधीच भाडे घेतले नाही. गिरे कुटंबीयांनी मनाचा दिलदारपणा दाखवला. राष्ट्र्वादीचे दिमाखदार कार्यालय यापूर्वीच उभा रहाणार होते. पण ते झाले नाही, हे काज आज पूर्ण झाले.

हेही वाचा: स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष सल्ला; म्हणाले...

पक्षाची संघटना मजबूत करताना नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे यासाठी प्रयत्न करू. ज्यांना संधी देता आली नाही त्यांचा विचार केला जाईल. हे कार्यालय शहराच्या राजकीय, सांस्कृतिक विकासाला व्यासपीठ देणारे असेल. इथे येणाऱ्या प्रत्येकाचे काम होईल असे नाही, पण जे कोणी कार्यालयात येतील त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. या कार्यालयात पक्ष नेतृत्व, कार्यकर्ते यांच्या मान खाली जातील असे कृत्य करणार नाही याचा विचार कार्यालयाच्य पायऱ्या चढतानाच करा. पक्षात कोणत्याही गटागटाने राजकारण करू नका. दर १५ दिवसाला विकास कामांसाठी आढावा घेऊन मेट्रो, घर बांधणी, झोपडपट्टी विकास याचा विचार केला जात आहे. पुणे पिंपरी चिंचवडचे पर्यटन वाढविण्यासाठी राज्य व केंद्राची मदत घेऊन प्रकल्प करू, यातून रोजगार उपलब्ध होईल.

आघाडीबद्दल वक्तव्य नको

राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आहे. या आघाडीबद्दल कोणीही काही बोलले तर स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी यावर बोलू नये. पक्षाचे प्रवक्ते बोलतील. कोणी प्रतिक्रिया विचारली तरी पक्षाचे नेते बोलतील असे उत्तर द्या. आपला पक्ष वाढवताना मित्र पक्षाशी संबंध खराब होऊ देऊ नका, असा सल्लाही पवार यांनी दिला.

loading image