Pune : किडनी रॅकेट प्रकरणी ससूनच्या डॉक्टरला अटक, बनावट कुटुंब दाखवून करायचे किडनी एक्सचेंज

Dr Ajay Taware Arrested In Kidney Racket : पोर्शे प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला आता किडनी रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं डॉक्टरला ताब्यात घेतलंय.
Dr Ajay Taware Arrested In Kidney Racket
Dr Ajay Taware Arrested In Kidney RacketEsakal
Updated on

पुण्यात बहुचर्चित किडनी रॅकेट प्रकरणी ससूनच्या माजी वैद्यकीय अधीक्षकाला ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं डॉक्टर अजय तावरेला अटक केलीय. अजय तावरेला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने तावरेला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. किडनी रॅकेट प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. पोर्शे कार प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी सध्या डॉक्टर तावरे हा न्यायालयीन कोठडीत होता. त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com