
पुणे : ससून रुग्णालयातील बाल शस्त्रक्रिया विभागाला (पेडियाट्रिक सर्जरी) रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील स्वतंत्र शस्त्रक्रियागृह (ऑपरेशन थिएटर) ससून प्रशासनाने दिले आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष शस्त्रक्रियांनाही सुरुवात झाली असून, आतापर्यंत १५ बालकांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियादेखील झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या जवळपास दीडशे बालकांच्या शस्त्रक्रियांचा मार्ग मोकळा झाला आहे. बालकांना स्वतंत्र शस्त्रक्रियागृह मिळावे, यासाठी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता.