
पुणे : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात ससून रुग्णालयातील ३४० परिचारिका सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला असून शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत. तसेच, रुग्णांची संख्या व उपचार कक्षातील संख्याही घटली आहे.