Pune Health Crisis : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागाने, निमोनियाच्या लक्षणांमुळे बालरुग्णांची संख्या वाढल्याने आणि मनपा रुग्णालयांमध्ये साधनसामग्री व डॉक्टरांअभावी ताण येत असल्याने, वारंवार रुग्ण पाठवू नयेत, अशी महापालिका रुग्णालयांना थेट सूचना दिली आहे.
पुणे : ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागाने कमला नेहरू रुग्णालय व भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र लिहून त्यांच्याकडे बालरुग्णांना वारंवार पाठवू नये, असे आवाहन केले आहे.