
पुणे : ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागातील प्रत्येक नवजात अर्भकांची जनुकीय विकारांची चाचणी करण्यात येते. त्यापैकी ‘जन्मजात हायपोथायरॉइडिझम’ या व इतर विकारांच्या जनुकीय चाचण्या करण्यात येत असून एप्रिलपासून आतापर्यंत ५१५ अर्भकांवर ही चाचणी केली आहे. त्यामुळे, दोन अर्भकांमध्ये मानसिक व्यंगास कारणीभूत ठरणारा ‘जन्मजात हायपोथायरॉइडिझम’ हा आजार वेळीच ओळखता आल्याने त्यांच्यावर उपचार झाले व त्यांना येणारे मानसिक व्यंग टळले.