Nurse Strike : नवे रुग्‍ण दाखल होण्यात घट; ससूनमधील परिचारिकांच्या संपाचा दुसरा दिवस

ससून रुग्णालयातील परिचारिकांच्या संपाचा फटका नवीन रुग्‍णांना दाखल करण्‍यावर होत आहे.
Sassoon Hospital

Sassoon Hospital

Sakal

Updated on

पुणे - ससून रुग्णालयातील परिचारिकांच्या संपाचा फटका नवीन रुग्‍णांना दाखल करण्‍यावर होत आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. नेहमीच्‍या तुलनेत नव्या रुग्णांच्या दाखल होण्यात ४० ते ४५ टक्क्यांनी घट झाली असून, नियोजित शस्त्रक्रियांवरही मोठा परिणाम दिसून आला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपाला रुग्णालयातील निम्म्याहून अधिक परिचारिकांनी प्रतिसाद दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com