

सासवड, ता. २६ : दिवाळीनिमित्त स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि वस्तूंच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सासवड नगरपरिषद व कुशाग्र इनोव्हेशनस फाउंडेशनच्या वतीने सासवड शहरात बुधवार (ता. २८) ते शुक्रवार (ता. ३०) दरम्यान, विशेष आरआरआर कलेक्शन ड्राइव्ह (री-यूज, री-सायकल, री-परपज) आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांत जाऊन नागरिकांकडून जुने कपडे, चप्पल-बूट, पुस्तके, वह्या, रद्दी, बॅगा, खेळणी, घरगुती भांडी व इलेक्ट्रॉनिक वस्तू संकलित केल्या जाणार आहेत. घरातील वापरात नसलेल्या वस्तू कचऱ्यात न टाकता त्यांचा पुनर्वापर व्हावा आणि कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
ज्या नागरिकांना आत्ता या उपक्रमात सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी शनिवार (ता. ३१) व रविवारी (ता. १) सासवडच्या शासकीय गोदामातील आरआरआर सेंटर पूर्ण दिवस सुरू राहील. तेथे नागरिक थेट वस्तू जमा करू शकतील, असे आयोजकांनी स्पष्ट केले. सर्व नागरिकांनी या पर्यावरणपूरक मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन सासवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी केले आहे.
न वापरल्या जाणाऱ्या वस्तू आरआरआर सेंटरला दिल्यास घंटागाडीवरील अतिरिक्त ताण कमी होईल. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल.
- डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.