

Malshiras Residents Plant Trees in Road Potholes
Sakal
माळशिरस : सासवड ते यवत मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे माळशिरस (ता. पुरंदर) येथील नागरिकांनी शुक्रवारी संतप्त होत प्रशासनाचा निषेध करत खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केले. माळशिरस गावातून यवतवरून भुलेश्वर घाटमार्गे सासवड ते यवत हा रस्ता जातो. या रस्त्याने माळशिरससह पूर्व भागातील पोंढे, टेकवडी, आंबळे, राजेवाडी वाघापूर, सिंगापूर, वनपुरी, उदाची वाडी, गुरोळी या पूर्व भागातील नागरिकांची सासवड या तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी नियमित ये -जा चालू असते.