

Ghazal Katta Returns to All India Marathi Sahitya Sammelan
Sakal
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात गझलेचे पुनरागमन झाले असून, साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनात गझल कट्टा पुन्हा रंगणार आहे. संमेलनातील गझल कट्ट्यासाठी स्वरचित गझल पाठविण्याच्या आवाहनाला गझलकारांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, संयोजकांना सहाशेहून अधिक गझलकारांकडून गझला प्राप्त झाल्या आहेत.