

साताऱ्यात मतचोरीविरोधात निदर्शने
सातारा, ता. १५ : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी रविवारी समतावादी संघटना आणि पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
हे आंदोलन वंचितचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार, पूजा बनसोडे, अजय सोनकांबळे, प्रीतम रणबागले, गौरी आवळे, अल्केश गावित, आदित्य कांबळे, सारिका भोसले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यावे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करा, लोकशाही विरोधी प्रवृत्तींना विरोध करा, विशेष सखोल फेर निरीक्षण रद्द करा, आदी मागण्या आंदोलनावेळी करण्यात आल्या. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले. याठिकाणी आंदोलनात भीम आर्मीचे कार्यकर्ते सहभागी झाले. याठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत फलक झळकवत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
...........
65978
सातारा : मतचोरीविरोधात आंदोलन करताना समतावादी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.