कोरेगाव सातारा रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू

कोरेगाव सातारा रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू
Published on

सकाळ इम्पॅक्ट

सातारा रेल्वे स्थानक इमारतीचे नूतनीकरण सुरू

प्रवासी संघाच्या पाठपुराव्याला यश; साडेतीन वर्षांत छताला गळती, प्लॅस्टर उडाले

कोरेगाव, ता. २४ : सातारा रेल्वे स्थानकाच्या नूतन इमारतीच्या छताची गळती व प्लॅस्टर उडून जाऊ लागल्याने सातारा रेल्वे प्रवासी संघ, सातारा रेल्वे स्थानक स्थानिक सल्लागार समिती व दैनिक ‘सकाळ’ने वारंवार आवाज उठवल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नुकतेच या इमारतीची दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

सातारा रेल्वे स्थानकासाठी जुन्या इमारतीला लागून चार वर्षांपूर्वी ऐतिहासिक लुक असलेली नवीन इमारत बांधली होती. या नूतन इमारतीचे उद्‍घाटन २८ फेब्रुवारी २०२३ रोजी झाले होते. त्याच वर्षी इमारतीचा छत गळू लागला होता, तर ठिकठिकाणी इमारतीचे प्लॅस्टर उडून जाऊ लागले होते. अनेक ठिकाणी फरशाही निघू लागल्या होत्या. परिणामी, ऐतिहासिक व सुंदर लुक असलेली ही इमारत नवीन असूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तब्बल १०० वर्षे जुनी जीर्ण असल्यासारखी दिसू लागली होती. या पार्श्‍वभूमीवर या इमारतीच्या निकृष्ट बांधकामाची तपासणी गुणवत्ता प्राधिकरण, दक्षता प्राधिकरणाकडून करण्याची मागणी सातारा रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे माजी सदस्य व सातारा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष विलास कदम यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्डाचे चेअरमन, मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य, पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे वारंवार निवेदने देऊन केली होती. दैनिक ‘सकाळ’नेही याबाबत वारंवार छायाचित्रांसह वार्तांकन करून आवाज उठवलेला होता. त्याची गंभीर दखल घेत नवीन इमारतीचे निकृष्ट दर्जाचे प्लॅस्टर काढून नवीन प्लॅस्टर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.


कोट...

सातारा रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचे निकृष्ट दर्जाचे प्लॅस्टर काढून आता पुन्हा नव्याने प्लॅस्टर करण्यात येत आहे. हे काम दर्जेदार व्हावे, यासाठी प्लॅस्टर करताना विविध प्रकारची बांधकाम केमिकल वापरावीत, जेणेकरून इमारतीचे प्लॅस्टर दर्जेदार, मजबूत होईल. बांधकामावर देखरेख करण्यासाठी अनुभवी निरीक्षक नेमावा.

-विलास कदम, अध्यक्ष, सातारा रेल्वे प्रवासी संघ

A08851
सातारा (क्षेत्र माहुली) : सातारा रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचे जुने प्लॅस्टर काढून नवीन करण्याचे काम सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Thousands of Warkaris Move Closer to Pandharpur as Palkhi Exits Satara District
Satara Rajpath fight latest update
Senior Revenue Officer Attacked in Satara; Investigation Underway Into Motive
Pune
Marathi News Esakal
www.esakal.com