काय सांगता? सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगरच्या कोरोना रुग्णांची पुण्याकडे धाव

काय सांगता? सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगरच्या कोरोना रुग्णांची पुण्याकडे धाव

पुणे : कोरोनावर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पुणे शहरात सातारा, सोलापूर, नगर, नाशिक आदी जिल्ह्यांतून रिघ लागली आहे. या रुग्णांवर त्यांच्या जिल्ह्यातच उपचार करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी खासगी रुग्णालयचालकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. 

कोरोनाचा उद्रेक सध्या वाढत आहे. त्यामुळे पुण्यात बारामती, सोलापूर, बार्शी, सातारा, कराड, फलटण, कोल्हापूर, सांगली, नाशिक, संगमनेर, नारायणगाव आदी ठिकाणांहून रुग्ण वाढत्या संख्येने शहरात येत आहेत. शहरातील कोरोनाच्या 44 रुग्णालयांत बेड या पूर्वीच भरले गेले आहेत. त्यामुळे या रुग्णांवर कसे उपचार करायचे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 

या बाबत डॉ. पी. के. ग्रॅंट म्हणाले, "पुण्याबरोबरच दररोज इतर जिल्ह्यांतून रुग्ण मोठ्या संख्येने आमच्याकडे येत आहेत. त्यांना दाखल करून घेण्याची आमची क्षमता नाही. त्यामुळे रुग्ण दाखल करून घेण्यासाठीही वेटिंग लिस्ट तयार करण्याची वेळ आली आहे. इतर जिल्ह्यांतील रुग्णांवर त्या-त्या ठिकाणी उपचार होण्याची गरज आहे." डॉ. धनंजय केळकर यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला आहे. इतर जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आमच्याकडे बेड्स भरले आहेत. त्या रुग्णांना स्टेबल करून अन्यत्र हलवावे लागत आहे. आम्ही आमची क्षमता वाढवित असलो तरी, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळेच आम्ही आता स्पेशल रूममध्येही रुग्णांची तयारी असेल तर, दुसरा पेशंट त्यात सामावून घेत आहोत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, "सातारा आणि सोलापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. तेथील मृत्यूदरही जास्त आहे. पुणे हे मेडिकलचे हब आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना थांबविणे शक्य नाही. त्या-त्या ठिकाणची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पुण्यातील रुग्णालयांनी त्यांची क्षमता वाढविणे आणि तीव्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी पाठविणे गरजेचे आहे. म्हणजे गरजू रुग्णांना बेड उपलब्ध होतील."

500 बेडच्या हॉस्पिटलचे काय? 

बालेवाडीमध्ये 500 बेडचे कोरोना केअर सेंटर उभे करण्याची घोषणा महापालिकेने एक महिन्यांपूर्वी केली होती. परंतु, त्या बाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. तसेच कोरोनाच्या प्रत्येक रुग्णालयात महापालिकेने एक अधिकारी नियुक्त करावा म्हणजे रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा सक्षम करता येईल. तेथे बेड उपलब्ध नसल्यास ज्या ठिकाणी बेड आहे, तेथे तरी त्या रुग्णांना पाठविता येईल, असे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सांगितले.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com