Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Pune BJP Satish Bahirat News : आपण कष्टाने वाढवलेल्या पक्षा'साठी या आधी उमेदवारी सोडली, त्यात अजून एक'ची भर अशी भावना बहिरट यांनी व्यक्त केली.
Satish Bahirat

Satish Bahirat

esakal

Updated on

Satish Bahirat withdraws nomination : पक्षश्रेष्ठी'चे पुन्हा आदेश मानत, भारतीय जनता पक्ष शिवाजीनगर विधानसभा माजी अध्यक्ष सतीश बहिरट यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षा'ची शिस्त राखन्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्याची आवश्यकता आहे . जर पक्षा'चे निष्ठावान चेहरेच संपून गेले तर पक्षाची विचार धारा देखील संपून जाईल. आपण कष्टाने वाढवलेल्या पक्षा'साठी या आधी उमेदवारी सोडली, त्यात अजून एक'ची भर अशी भावना बहिरट यांनी व्यक्त केली.

बहिरट यांनी २०१७ पुणे महानगरपालिका निवडणूकी प्रमाणे २०२५- २०२६ मध्ये देखील अनेकांचे लक्ष वेधले. बहिरट यांची उमेदवारी ही प्रभाग क्र ०७ ( गोखलेनगर- वाकडेवाडी) मधे चर्चेचा विषय बनली होती. अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांची तळागाळातल्या पक्षाच्या मतदारांपर्यंत पोच आहे. पक्षाचा स्थानिक चेहरा म्हणून बहिरट यांची अनेक वर्षांपासून त्यांच्या भागामध्ये ओळख देखील आहे.

जर बहिरट हे पक्ष विरोधात उभे राहिले असते तर त्याचा मोठा फटका हा पक्षाच्या मतदानाला बसत होता असे सर्वत्रिक कार्यकर्ते व मतदारांमध्ये चर्चा रंगली होती. पण आता या चर्चेला पूर्णवीराम लागलेला आहे.

Satish Bahirat
Pune Election 2026 : पुण्यात भाजपचा श्रीगणेशा! प्रभाग ३५ मध्ये दोन उमेदवार बिनविरोध विजयी

पक्षनिष्ठा काय असते हे सतीश बहिरट यांनी पुन्हा दाखवून दिले. पक्ष त्यांना यंदाच्या वर्षी यथोगत सन्मान प्राप्त करून देईल अशी पूर्ण खात्री वरिष्ठांकडून सर्व कार्यकर्त्यांमध्ये देण्यात आलेली आहे. बहिरट यांच्या माघारी नंतर प्रभागामध्ये पुन्हा एकदा भाजपमय वातावरण प्रस्थापित झालेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com