
पुण्यात ९ डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचं अपहरण झालं. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणी घाटात आढळून आला. त्यांच्या शरिरावर असंख्य वार करण्यात आले होते. या हत्ये प्रकरणी आता पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनीसह इतर आरोपींना अटक केलीय. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी अक्षय जावळकरला दिली होती. मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर हे गेल्या २० वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे. मनावर ताबा नसेल तर काय घडू शकतं याचंच उदाहरण म्हणजे सतीश वाघ हत्या प्रकरण. साता जन्माची सोबती म्हणून जिच्यासोबत सप्तपदी चालले तिनेच आयुष्याची दोर कापली. हव्यास, वासना, छळ आणि वर्चस्व या ४ दुष्टकोनानी भरलेली ही कहाणी अंगावर काटा येईल अशीच आहे.