Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे यांच्याबाबत काँग्रेसचे तांबे म्हणाले...

टीम ई-सकाळ
Friday, 4 October 2019

पुणे : शिवसेनेकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. तरुण राजकारणात आले पाहिजे. ही माझी कायमच इच्छा आहे. मात्र, आदित्यला शुभेच्छा सोडून मी काहीच देवू शकत नाही, असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर तांबे यांनी ट्विट करत सांगितले, की निवडणूक लढणं हा लोकशाहीतील एक महत्वाचा टप्पा आहे. ठाकरे कुटुंबीय कायमचं याच्याबाहेर राहून राजकारण करीत आले आहेत. मात्र, आता आदित्य निवडणूक लढवत आहेत. ही अतिशय चांगली बाब आहे. तरुण राजकारणात आले पाहिजे ही माझी कायमच इच्छा आहे. मात्र, आदित्यला शुभेच्छा सोडून मी काहीच देवू शकत नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satyajeet tambe says About Aditya Thackerays Candidacy Maharashtra Vidhan Sabha 2019