पुणे - आरोपीने त्याच्या वकिलांसोबत नियमित संपर्कात राहून आवश्यक सूचना घेतल्या पाहिजेत, या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणात राहुल गांधी यांना न्यायालयात वैयक्तिक हजर राहून स्पष्टीकरण देण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज सात्यकी सावरकर यांनी विशेष न्यायालयात केला आहे.