Big Breaking : सौरभ राव यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

IAS_Sourabh_Rao
IAS_Sourabh_Rao

पुणे : विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांची पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राव यांनी शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी मावळते विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.
डॉ. म्हैसेकर गेल्या सव्वादोन वर्षांपासून विभागीय आयुक्तपदी कार्यरत होते. पश्चिम महाराष्ट्रातील महापूर, दुष्काळग्रस्त स्थिती आणि त्यानंतर कोरोनाच्या संकटात त्यांनी परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली. 

राव यांनी यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि साखर आयुक्त या पदावर काम केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित निरोप समारंभास पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह विभागातील अन्य जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

नवे विभागीय आयुक्त सौरभ राव हे माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळतील. कोरोनाच्या संकटात निश्चित चांगला मार्ग काढतील. सेवानिवृत्तीनंतर आपण पुण्यातच स्थायिक होणार असून, सामाजिक सेवेत कार्यरत राहणार आहोत.
- डॉ. दीपक म्हैसेकर, मावळते विभागीय आयुक्त 

डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याबाबत कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आदर आहे. कोरोनाच्या संकटात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा यापुढेही समाजाला लाभ होईल.
- सौरभ राव, नवे विभागीय आयुक्त, पुणे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com