esakal | पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 'जम्बो हॉस्पिटल' लवकरच रुग्णांच्या सेवेत; प्रशासनाने दिले संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Jumbo_Hospital

रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना शहरात घडत आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 'जम्बो हॉस्पिटल' लवकरच रुग्णांच्या सेवेत; प्रशासनाने दिले संकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीने जम्बो हॉस्पिटल उभारण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासन हलले असून, आता पिंपरी चिंचवड येथे दहा दिवसांत एक तर पुण्यात २० दिवसांत दोन असे एकूण तीन जम्बो हॉस्पिटल अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना बेड्स उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

'तमिळनाडू पॅटर्न' राज्यात राबवा; ज्युनिअर वकिलांची राज्य सरकारकडे मागणी!​

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना शहरात घडत आहेत. रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात जम्बो हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु निविदांच्या अटी शर्ती आणि वर्कऑर्डरमध्ये बराच वेळ जाण्याची शक्यता होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या बैठकीत प्रशासनाला जम्बो हॉस्पिटल तातडीने उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून २० दिवसांत प्रत्यक्षात जम्बो हॉस्पिटल सुरू करता येतील असे सांगितले आहे.

पुण्यात शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊनबाबत प्रशासनाने दिले स्पष्टीकरण; वाचा सविस्तर​

पिंपरी-चिंचवड ऑटो क्लस्टर भागात दहा ऑगस्टपर्यंत तर पुणे शहरातील सीओईपी आणि एसएसपीएमएस येथे २० ऑगस्टपर्यंत जम्बो हॉस्पिटल अस्तित्वात येईल. या हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी ५२५ ऑक्सिजन बेड्स आणि ६० आयसीयू बेड्स उपलब्ध होतील, असे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image