कुर्डुवाडीच्या उपनगराध्यक्षपदी सविता जगताप.. स्वीकृत नगरसेवकपदी धनंजय डिकोळे व वसीम मुलाणी
KDW26B04720
सविता जगताप
KDW26B04717
धनंजय डिकोळे,
KDW26B04718
वसीम मुलाणी
कुर्डुवाडीच्या उपनगराध्यक्षपदी सविता जगताप बिनविरोध
स्वीकृत नगरसेवकपदी धनंजय डिकोळे अन् वसीम मुलाणी यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. १६ : कुर्डुवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं (ए) युतीच्या सविता जगताप यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे वसीम मुलाणी या दोघांची निवड झाली.
नगरपालिकेत झालेल्या सभेमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा जयश्री भिसे होत्या. उपनगराध्यक्षपदासाठी सविता जगताप यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना(उबाठा) च्या वतीने स्वीकृत नगरसेवकपदासाठी धनंजय डिकोळे यांचा एकमेव तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वसीम मुलाणी व नितीन पवार या दोघांचे अर्ज आले होते. गटनेते समीर मुलाणी यांनी दिलेल्या शिफारशीनुसार वसीम मुलाणी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाइंचे बापूसाहेब जगताप, महेश गांधी, दत्ता काकडे, बाबासाहेब गवळी, अखलाक दाळवाले, यासीन बहामद, विशाल गोरे, माणिक श्रीरामे, सोमनाथ गवळी आदी उपस्थित होते.
असे आहे पक्षीय बलाबल
कुर्डुवाडी नगरपरिषदेत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस व बापूसाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखालील रिपाइं(ए) यांच्या युतीचे १३ नगरसेवक, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नगराध्यक्षासह ५ नगरसेवक, शिवसेनेचा १ नगरसेवक व अपक्ष १ नगरसेवक निवडून आले आहेत. १ अपक्ष नगरसेवकाने शिवसेना (उबाठा) पक्षाला पाठिंबा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

