पुणे विद्यापीठात क्रीडांगणाचा ‘खेळ’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दीड वर्षापासून क्रीडांगणाचे काम सुरू असून, ते अद्याप अर्धवटच आहे. क्रीडांगणाचा सुरू असलेला हा ‘खेळ’ थांबवून ते आम्हाला लवकर खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दीड वर्षापासून क्रीडांगणाचे काम सुरू असून, ते अद्याप अर्धवटच आहे. क्रीडांगणाचा सुरू असलेला हा ‘खेळ’ थांबवून ते आम्हाला लवकर खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी २०१६ रोजी क्रीडांगणाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर दीड वर्षात क्रीडांगणासह संकुलाचे काम पूर्ण होणे आवश्‍यक होते. यासाठी पुणे विद्यापीठाचा काही निधी व विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्याकडून १५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

क्रीडा संकुलातील अपूर्ण कामे दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील. प्रेक्षक गॅलरीचे कामही लवकर पूर्ण होईल. या कामास उशीर होत असल्याने कराराप्रमाणे ठेकेदाराला दिवसाला एक हजार रुपयांचा दंड केला जात असून, तो बिलातून वसूल केला जाईल.
- आर. व्ही. पाटील, कार्यकारी अभियंता, पुणे विद्यापीठ 

विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुल बांधण्याचे काम हाती घेतले. पण हे काम पूर्णच होत नाही. त्यामुळे आम्हाला त्याचा वापर करता येत नाही. विद्यापीठाने हे काम लवकर पूर्ण करून क्रीडांगण खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावे.
- दयानंद शिंदे, विद्यार्थी, पुणे विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitiribai phule pune university