पुणे : विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं उद्या होणार नाही अनावरण!

यंदा कोरोनाच्या संसर्गाचं कारण सांगत कार्यक्रम ढकलला पुढे
Savitribai Phule Pioneer Of Indian Womens Education
Savitribai Phule Pioneer Of Indian Womens Education

पुणे : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचं (Corona patients) कारण देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule) उद्या होणारा सावित्रीबाईंच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी देखील ३ जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. (Savitribai Phule statue will not be unveiled at Pune university tomorrow)

उद्या होणारा सोहळा पुढे ढकलण्यामागचं कारण सांगताना प्राध्यापक हरी नरके यांनी ट्विट करुन सांगितलं की, रविवार, ९ जानेवारी २०२२ रोजी होणारा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ पुढे ढकलण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात गेल्या चार ते पाच दिवसात करोनाग्रस्ताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

यापूर्वीचा कार्यक्रमही ढकलला होता पुढे

यापूर्वी ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा अनावरण कार्यक्रम होणार होता. पण राज्यपालांना याबाबत उशीरा माहिती देण्यात आली त्यामुळं त्या दिवशी त्यांचा दुसरीकडे नियोजित दौरा ठरलेला असताना ते या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी प्रा. नरके यांनी हा कार्यक्रम आता ९ जानेवारीला दुपारी ४ वाजता होईल असं जाहीरंही केलं होतं. या कार्यक्रमाला राज्यपाल, उपमुख्यमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी हरी नरके लिखित इंग्रजीतील सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं.

Savitribai Phule Pioneer Of Indian Womens Education
मराठा आरक्षण : १२ जानेवारीला SC त महत्त्वपूर्ण सुनावणी; हा मुद्दा मांडणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. १२ फूट उंचीचा हा पुतळा ब्रॉंझ धातूमध्ये घडवण्यात आला आहे. त्यांच्या डाव्या हातामध्ये पुस्तकही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com