Pune : विद्यापीठात शुल्कवाढी विरोधात घंटानाद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule Pune University

Pune : विद्यापीठात शुल्कवाढी विरोधात घंटानाद आंदोलन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांचे बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू झाले आहे. सोमवार (ता.११) पासून विविध विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मुख्य इमारत आवारातील संविधान स्तंभाजवळ बेमुदत आंदोलन पुकारले आहे. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सोमवारी सकाळी आंदोलक विद्यार्थ्यांना भेट दिली. सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून झालेली भरमसाठ शुल्कवाढ जोपर्यंत पूर्ववत होत नाही. तोपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे, असे मत आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत तोपर्यंत आम्ही भरपावसात २४ तास आंदोलन करणार आहोत.

- तुषार पाटील निंभोरेकर, विद्यार्थी

विद्यापीठ प्रशासनाने केलेली शुल्कवाढ ही फार चुकीची पद्धतीची आहे. कोणत्याही प्रकारचे विद्यार्थीहित या शुल्कवाढीमध्ये नसून गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

- तुकाराम शिंदे, विद्यार्थी

विद्यापीठ प्रशासनाने भरमसाठ केलेली शुल्क त्वरित मागे घ्यावी. जोपर्यंत शुल्क पूर्ववत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील

- पौर्णिमा गायकवाड, विद्यार्थिनी

विद्यार्थ्यांच्या मागण्या....

१) पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.ची शुल्कवाढ पूर्ववत करणे.

२) वसतिगृहाची शुल्कवाढ पूर्ववत करणे.

३) विद्यापीठाशी संलग्नित संशोधन केंद्रांचे शुल्क हे विद्यापीठाच्या शुल्काशी समांतर असावे.

४) संशोधक विद्यार्थ्यांचे वसतिगृह लवकरात लवकर चालू करणे.

५) पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची बंद केलेली अधिछात्रवृत्ती सरसकट पुन्हा चालू करणे.

६) अनिकेत कँटीन आणि झेरॉक्स सेंटर, इंटरनेट कॅफे पूर्वीच्याच जागेवर तत्काळ सुरू करणे.

Web Title: Savitribai Phule Pune University Bell Ringing Agitation Against

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..