

Traffic Congestion to Ease as SPPU Chowk Flyover Nears Opening
Sakal
पुणे: पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (आचार्य आनंदऋषीजी चौक) दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे राहिल्याने ती पूर्ण करून पुढील महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सेनापती बापट रस्त्यासह परिसरात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.