विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने लावला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

कोरोनाची स्थिती पाहता प्रथम सत्रासाठी 2019-20 या वर्षाप्रमाणेच शुल्क घ्यावे, वाढीव शुल्क घेऊ नये असे आदेश गेल्या महिन्यात दिले होते.​

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रातही वाढीव परीक्षा शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पहिल्या सत्राचे वाढीव परीक्षा शुल्क रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता.

पुणे विद्यापीठाने 2020-21 या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकरी गेल्याने, व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ही शैक्षणिक वाढ पुढच्या वर्षापासून करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता, पण परीक्षा शुल्काबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.

ना पूर्ण पगार, ना नोकरीची हमी; अन् वरून राजीनामा देण्यासाठी दबाव!​

2020-21 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी परीक्षा विभागाने शुल्क वाढ करताना त्यामध्ये प्रोजेक्‍ट शुल्क आणि इतर कारणांनी शुल्क घेतले जात असल्याने शुल्क मोठ्या प्रमाणात वाढल्याची तक्रार केली विद्यार्थ्यांनी होती. कोरोनाची स्थिती पाहता प्रथम सत्रासाठी 2019-20 या वर्षाप्रमाणेच शुल्क घ्यावे, वाढीव शुल्क घेऊ नये असे आदेश गेल्या महिन्यात दिले होते. परंतु, हा निर्णय घेताना दुसऱ्या सत्राचा विचार विद्यापीठाने केलेला नव्हता.

UPSC CSE 2020: मुख्य परीक्षेचं अॅडमिट कार्ड करा डाऊनलोड; वाचा सविस्तर​

अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप पालकांसमोरील आर्थिक अडचणी कमी झालेल्या नाहीत, त्यामुळे विद्यापीठाने दुसऱ्या सत्राचेही वाढीव परीक्षा शुल्क घेण्यास स्थगिती दिली आहे. याबाबत परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी 2020-21च्या दुसऱ्या सत्रातही गतवर्षी प्रमाणे शुल्क घ्यावे, वाढीव शुल्क घेऊ नये असे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University decided not to extra charge in exam fees