पुणे विद्यापीठाकडून दिवाळीची सुट्टी जाहीर; लागोपाठ सुट्ट्यांमुळे कर्मचारी आनंदले!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

एकूण चार दिवसांच्या सुटीमुळे विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिवाळीनिमित्त शुक्रवारपासून (ता.१३) ते सोमवारपर्यंत (ता. १६) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढला आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकांसह प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी मिळाल्यामुळे दिवाळी अधिक गोड होणार आहे.

Breaking : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा निकाल

दिवाळीच्या सणानिमित्त बहुतांश सरकारी, निमसरकारी कार्यालयांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून दिवाळीची सुटी गुरूवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार शुक्रवार, शनिवार आणि सोमवारी सुटी जाहीर केली आहे. दिवाळीच्या सुटीनंतर मंगळवारीपासून (ता.१७) विद्यापीठातील कार्यालयांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या तीन दिवसांची सुटी आणि त्याला जोडून रविवारची सुटी आली आहे. अशा एकूण चार दिवसांच्या सुटीमुळे विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University declared holidays on the occasion of Diwali