Breaking : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा निकाल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

या शिष्यवृत्ती परीक्षांचा तात्पुरता निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर केला होता. त्यानंतर शाळांमार्फत गुणपडताळणीचे अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून आता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या निकाल गुरुवारी (ता.१२) जाहीर करण्यात आल्या. परिषदेच्या www.mscepune.in आणि http://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचा निकाल पाहता येणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे एक लाख ३६ हजार ८२१ विद्यार्थी, तर आठवीचे ५७ हजार ५६७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील पाचवीच्या १६ हजार ६८४ विद्यार्थ्यांना, तर आठवीच्या १४ हजार ७४४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Diwali Festival 2020 : वसुबारस : पहिला दिवा आज लागणार दारी​

या शिष्यवृत्ती परीक्षांचा तात्पुरता निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर केला होता. त्यानंतर शाळांमार्फत गुणपडताळणीचे अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून आता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. परिषदेच्या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांना आसन क्रमांक टाकून निकाल पाहता येणार आहे. तसेच शाळांना त्यांच्या लॉगिनमध्ये एकत्रित निकाल पाहता येईल. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या जाहीर केल्या असल्याची माहिती आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार तिहेरी​

परीक्षेची सांख्यिकी माहिती:

परीक्षेचे नाव नोंदविलेले विद्यार्थी उपस्थित विद्यार्थी पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
पाचवी ५,७४,५८१ ५,५२,०६४ १,३६,८२१ १६,६८४
आठवी ३,९७,५२३ ३,८१,७८७ ५७,५६७ १४,७४४
एकूण ९,७२,१०४ ९,३२,८५१ १,९४,३८८ ३१,४२८

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: final results of fifth and eighth std scholarship exams were announced on Thursday 12th Nov 2020