परीक्षेला उशीर नकोच; MPSCच्या गोंधळानंतर पुणे विद्यापीठ झालं सावध

Students_Exams
Students_Exams

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा ठरलेल्या नियोजनानुसार झाली नाही, तर पुन्हा ‘एमपीएससी’च्या परीक्षेप्रमाणे गोंधळ होईल. त्यासाठी सर्व तयारी वेगात करा आणि ११ एप्रिलपासूनच परीक्षा सुरू करा अशी चर्चा शनिवारी (ता.१३) व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आली. दरम्यान, ऑनलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन कंपनीने सादरीकरण करून परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल. त्यासाठी तयारी कशी आहे याचे सादरीकरण केले. मात्र, कंपनीला अधिकृत पत्र मिळण्याची अद्याप प्रतीक्षा आहे.

पुणे विद्यापीठाला एजन्सी निवडीच्या निर्णयात उशीर झाल्याने मार्च महिन्यात परीक्षा सुरू करता आली नाही. यावरून नाराजीचा सूर उमटत असताना आता परीक्षा मंडळाने ११ एप्रिलपासून प्रथम सत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेमध्ये यावर चर्चा करण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या मालकीची ‘एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन प्रा. लि.’ ही कंपनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेणार असल्याने व्यवस्थापन परिषदेच्या सूचनेनुसार शनिवारी (ता. १३) सादरीकरण करण्यात आले.

विद्यापीठाच्या कंपनीने त्यांच्याकडे सध्या काय यंत्रणा आहे, त्याचा वापर परीक्षेसाठी कसा पुरेसा आहे, तसेच परीक्षेच्या काळात नव्याने काय सुविधा दिल्या जातील, सपोर्ट सिस्टीम कशी आहे आदी माहितीचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. सदस्यांनी कंपनीच्या क्षमतेबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचीही उत्तरे देण्यात आली. त्यानुसार ‘एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनला काम देण्याची सदस्यांनी मान्य केले आहे. पर्चेस कमिटी पुढे कंपनी निवडीचा विषय ठेवला जाणार असून, त्यानंतर अधिकृत पत्र कंपनीला मिळेल असे सदस्यांनी सांगितले.

‘‘कंपनीला त्यांच्या सक्षमतेवर अनेक प्रश्‍न विचारले, त्यांची त्यांनी उत्तरे दिली. अंतिम वर्षाच्या परीक्षेत देखील विद्यापीठाच्या कंपनीने मदत केली होती. त्यामुळे पूर्वीचे जे दोष होते ते दूर केले आहे. एमपीएससीच्या परीक्षेचा जसा गोंधळ झाला, तसा होऊ नये म्हणून विद्यापीठाची परीक्षा ११ एप्रिललाच सुरू होईल. तारखेत बदल केला जाणार नाही. याचे अधिकृत परिपत्रक व वेळापत्रक २५ मार्चला जाहीर केले जाईल.’’
- डॉ सुधाकर जाधवर, सदस्य, व्यवस्थापन परिषद

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com