विद्यार्थ्यांनो पुणे विद्यापीठात अॅडमिशन घ्यायचंय? तुमच्याकडे आहे शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

पुणे विद्यापीठाने ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात केल्यानंतर दोन वेळी मुदतवाढ देऊन १० ऑगस्ट ही अखेरची तारीख सांगण्यात आली होती.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीला प्रवेश घ्यायचा आहे, पण प्रवेश परीक्षेसाठी अद्याप अर्ज केला नाही, अशा विद्यार्थ्यांना आता ही शेवटची संधी आहे. सोमवारी (ता.३१) अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत संपणार असल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे. आत्तापर्यंत विविध अभ्यासक्रमासाठी ३१ हजारापेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत.
पुणे विद्यापीठाच्या आवारात पदव्युत्तर पदवीचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

Ganeshotsav 2020 : १२८ वर्षांत पहिल्यांदाच मिरवणूकीविना होणार बाप्पाचं विसर्जन!

यासाठी महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून हजारो विद्यार्थी अर्ज करतात. यंदा कोरोनामुळे पुणे विद्यापीठाचे प्रवेश कसे होणार याकडे लक्ष लागलेले होते. पुणे विद्यापीठाने ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात केल्यानंतर दोन वेळी मुदतवाढ देऊन १० ऑगस्ट ही अखेरची तारीख सांगण्यात आली होती. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबात निर्णय होण्यास झालेला विलंब आणि विद्यार्थ्यांकडून होणारी चौकशी यामुळे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली होती.

जिल्हा परिषद आणि 'पीएमआरडीए'च्या महसूलला बसणार फटका; राज्य सरकारच्या चलाखीचा परिणाम​

आत्तापर्यंत या प्रवेश परीक्षेसाठी सुमारे ३१ हजार अर्ज आले आहेत. यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रॉक्‍टर्ड प्रणालीचा वापर करून ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. सोमवार हा प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने
इच्छुक विद्यार्थ्यांनी www.unipune.ac.in संकेतस्थळावरून अर्ज भरावा. याबाबत सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University informed about last chance to get admission