

SPPU Issues Advisory on Leopard Sighting
Sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची अफवा आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यापीठाने सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने वन विभागाशी संपर्क साधून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून, विद्यापीठाच्या आवारात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.