
स्वतः दृष्टीहीन असून परिस्थितीशी झगडून दिव्यांग व दृष्टिहिनासाठी महाविद्यालय उभ्या करणाऱ्या संस्थापिका जाई खामकर यांनी केलेले काम गौरवास्पद असल्याचे मत सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
टाकळी हाजी (पुणे) : दिव्यांग व दृष्टीहीनासाठी भारतातील पहिले निवासी महाविद्यालय हे पुणे विद्यापीठात असणे हा विद्यापीठाचा सन्मान आहे. स्वतः दृष्टीहीन असून परिस्थितीशी झगडून दिव्यांग व दृष्टिहिनासाठी महाविद्यालय उभ्या करणाऱ्या संस्थापिका जाई खामकर यांनी केलेले काम गौरवास्पद असल्याचे मत सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा : जिल्हा परिषदेचे बांधकाम आरोग्य समितीचे सभापती रामभाऊ बाबासाहेब बराटे यांचे हृदयविकाराने शुक्रवारी रात्री निधन
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे भारतातील दिव्यांगांसाठीचे पहिले निवासी डिजिटल न्यु व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन व वृक्षारोपण सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिल्लीचे माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, माजी आमदार पोपटराव गावडे, मळगंगा संस्थेच्या संस्थापिका जाई खामकर, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, एम.एस.जाधव, भूमी अभीलेख उपअधिक्षक विनायक ठाकरे, हायर कंपनीचे पंकज चावला, ग्रामविस्तार अधिकारी राजेश खराडे, शोभा मंदिलकर, विमल खामकर, बाळासाहेब चोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
हे ही वाचा : घरात आई -वडील नाही; दोन्ही लहाण मुले झोपले असताना अचानक लागली आग आणि....
मुळे म्हणाले की, ज्ञानाची दृष्टी देऊन विद्या अलंकाराने दृष्टीहीन व दिव्यांगाना घडविण्याचे काम महत्वाचे असून अशा या महिलेचा आदर्श समाजाने घ्यावा. यासाठी समाजाने देखील संस्थेला योगदान करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रात्साविक दत्ता कारंडे व लहू साबळे यांनी केले. आभार पद्माकर गोरे यांनी मानले.
या महाविद्यालयाला हायर अप्लायन्स कंपनीने सरंक्षण भिंत 10 लक्ष रूपये, एक वर्गखोली बांधकामासाठी कमल गादीया पाच लक्ष रूपये तर अर्जुन थोरात यांनी 200 नारळ, आंबे, चिक्कूची झाडे संस्थेला दिली. फक्त या परिसरात फळ, फुले अशी उपयोगीता असणारी झाडे लावून परिसर फुलविण्याचे काम करणार असल्याचे खामकर यांनी सांगितले.