sawai gandharv bhimsena mahotsav
sakal
पुणे - सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना सुश्राव्य कंठसंगीत अन् वाद्यसंगीताची पर्वणी मिळाली. या स्वरमंचावर प्रथमच सादरीकरण करत असलेल्या हृषीकेश बडवे आणि इंद्रायुध मजुमदार यांनी पूर्वार्ध रंगवला. विदुषी पद्मा देशपांडे यांच्या गायनानंतर जॉर्ज ब्रूक्स व पं. कृष्णमोहन भट यांचे अनोखे सॅक्सोफोन-सतार सहवादन, हा या दिवसाचा उत्कर्षबिंदू ठरला.