Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
sakal
पुणे - युवा संतूरवादक सत्येंद्रसिंह सोलंकी यांनी रंगवलेल्या ‘राग वाचस्पती’ने तिसऱ्या दिवसाची सुरेल नांदी झाली. श्रीनिवास जोशी यांनी गुरूंना अभिवादन करत ‘राग पूरिया’ प्रस्तुत केला; तर ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शुजात हुसेन खाँ आणि ज्येष्ठ गायिका विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे या दिग्गजांनी ‘यादगार’ मैफील रंगवत या दिवसाची समर्पक सांगता केली.