Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश

jayanthi-kumaresh
jayanthi-kumaresh

Sawai Gandharva 2019 : ‘शॉपिंगपासून जीवनशैलीपर्यंत सर्वच गोष्टींत बदल झाला आहे. बदल हा निसर्गनियमच आहे. त्यापासून संगीत तरी कसे बाजूला राहील. त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात बदल होतील. त्यामुळे संगीतावर विपरीत परिणाम होणार नाही. ते चिरकाल आनंद देत राहील. नव्या पिढीने रियाजाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे,’’ अशा भावना सरस्वती वीणावादक जयंती कुमरेश यांनी व्यक्त केल्या.

‘सकाळ’शी त्या बोलत होत्या. शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्यांची व कार्यक्रमांचीही संख्या वाढली आहे. आपले कलाकार जागतिक कलाकारांबरोबर संवादी होऊ लागले आहेत. संगीतात बदल निश्‍चित होत आहेत. मात्र, जीवनातील बदल जसे स्वीकारले, तसे संगीतातील बदलही स्वीकारले पाहिजेत. त्यातूनही या क्षेत्राला चांगले काहीही नक्कीच मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. विलंबित शैली कमी होते आहे का, यावर त्या म्हणाल्या, ‘‘बदल हाच स्थिर असतो. त्यामुळे नुकसान होत नाही. मांडणीच्या पद्धती बदलतात.

संगीताचे मूलतत्त्व तेच राहते. संगीत यापुढे हजारो वर्षे चिरकाल टिकून राहील. नव्या पिढीतील कलाकारांचा रियाज कमी होतो आहे, यावर त्या म्हणाल्या, मी गुरुकुल पद्धतीने शिकले. त्या वेळी शाळेत जाणे आणि रियाज करणे एवढेच काम होते. आता तंत्रज्ञान बदलले, गॅजेट हाती आली आहेत. त्यामुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित राहत नाही. त्याची काळजी घेण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये या संगीताला प्रोत्साहन दिले, तर त्याचे महत्त्व नव्या पिढीलाही समजेल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com