

Artist Lineup Announced for Sawai Gandharva Festival 2025
पुणे :अभिजात शास्त्रीय संगीताचा अवीट स्वरोत्सव असणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदा सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा सोमवारी झाली. दरवर्षीप्रमाणेच यंदाही महोत्सवात उदयोन्मुख आणि दिग्गज कलाकारांचा मिलाफ आहे. मात्र विशेष म्हणजे यातील निम्म्याहून अधिक कलाकार ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच सादरीकरण करणार आहेत. महोत्सवाचे आयोजक असलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी मंडळाचे विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मूळगुंद, डॉ. प्रभाकर देशपांडे, आनंद भाटे आदी उपस्थित होते.