Sawai Gandharva Festival: ‘आनंद’दायी आवाजाची ‘वर्ल्ड बुक’मध्ये नोंद
Anand Deshmukh Anchor: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे ३३ वर्षे सलग प्रभावी सूत्रसंचालन करणारे निवेदक आनंद देशमुख यांचा जागतिक विक्रम. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या शब्दसेवेची नोंद, महोत्सवात सन्मान.
पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा स्वरयज्ञ गेल्या ३३ वर्षांपासून आपल्या ‘आवाजा’ने बांधून ठेवणारे निवेदक म्हणजे आनंद देशमुख. महोत्सवात शनिवारी त्यांच्या या शब्दसेवेचा यथार्थ सन्मान झाला.