Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
sakal
- सायली पानसे-शेल्लेकरी
कलाकारांचे दैवत असलेल्या भीमसेनजींना, सवाईच्या मंचावरून श्रद्धांजली वाहण्याचे स्वप्न प्रत्येक पिढीतील कलाकार उराशी बाळगून असतो. अशाच तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हृषीकेश बडवे यांनी ७१व्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपल्या गानसेवेने केली.
भारदस्त आवाज आणि आश्वासक गायकीतल्या ‘गावती’ रागाने काही मिनिटांतच मैफील काबीज केली. बोल आलापीच्या माध्यमातून विस्तार, गमकयुक्त सरगम, दाणेदार तान, असे अनेक पैलू त्यांच्या गायनात दिसले.