

Sawai Gandharva Festival
sakal
पुणे : घरात कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना आई-वडिलांनी मुलाला गायक करण्याचे पाहिलेले स्वप्न... त्यासाठी पाचव्या वर्षापासून गाणे शिकायला सुरुवात... पाच वर्षे कर्नाटकी संगीताचे शिक्षण... पण आवाज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी अधिक योग्य असल्याचे कोणी सुचवल्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण... असा विलक्षण प्रवास असलेल्या युवा गायक सिद्धार्थ बेलमण्णु यांनी शनिवारी ‘सवाई’च्या स्वरांगणात आपल्या आश्वासक गायकीने प्रवेश केला.