पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगत मांत्रिकाने ५२ लाख रुपयांना गंडवले

पैशांचा पाऊस पाडून देतो. त्यासाठी पूजा करावी लागेल व त्यात काही पैसे ठेवावे लागतील, असा बनाव करून एका मांत्रिकाने व्यावसायिकाला ५२ लाख रुपयांना गंडा घातला
Crime
CrimeSakal

पुणे - पैशांचा पाऊस (Money Rain) पाडून देतो. त्यासाठी पूजा करावी लागेल व त्यात काही पैसे (Money) ठेवावे लागतील, असा बनाव करून एका मांत्रिकाने (Magician) व्यावसायिकाला (Businessman) ५२ लाख रुपयांना गंडा (Cheating) घातला आहे. पैशाच्या हव्यासापायी व्यावसायिकाने ५२ लाख रुपये मांत्रिकाला दिले. पण पैशांचा पाऊस न पाडता मांत्रिकाने आणखी पैशांची मागणी केल्याने व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली. (Saying that it Rains Money Magician Squandered Rs 52 Lakh Crime)

मांत्रिकाच्या जाळ्यात अडकलेल्या या व्यावसयिकाने पोलिस उपायुक्तांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर जालना जिल्ह्यातून या मांत्रिकाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. किसन आसाराम पवार (वय ४१, रा. हिवरखेड, जालना) असे या मांत्रिकाचे नाव आहे. या प्रकरणी धायरीतील गणेशनगरमध्ये राहणा-या ४० वर्षाच्या व्यावसायिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना त्यांच्या एका मित्राने जालन्यातील एक मांत्रिक पैशाचा पाऊस पाडत असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी २०१६ साली पवारची भेट घेतली.

Crime
मायलॅबचे 'कोव्हीसेल्फ' किट विक्रीसाठी उपलब्ध

पैशांच्या पाऊस पाडण्यासाठी आपल्याला छोटीशी पूजा करावी लागेल. पूजेसाठी काही पैसे पूजेत ठेवावे लागतील, असे त्यावेळी पवार याने फिर्यादी यांना सांगितले. त्यामुळे फिर्याद यांनी वेळोवेळी थोडे थोडे करून तब्बल ५२ लाख १ हजार रुपये पवार याला दिले. त्यानंतरही त्याने पैशाचा पाऊस पाडला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी पैसे देणे बंद केले. फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच फिर्यादी यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार केली. युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रेय काळे, अंमलदार दीपक मते, महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, संदीप तळेकर, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, सुजित पवार, संतोष क्षीरसागर, विल्सन डिसोझा, कल्पेश बनसोडे, रामदास गोणते, सोनम नेवसे यांनी ही कारवार्इ केली.

माझ्यात दैवी शक्ती : मांत्रिकाचा बनाव

मित्राचे म्हणणे आणि पवार याचा आविर्भाव पाहून फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला. माझ्यात दैवी शक्ती असून चमत्कार करण्याचा दावा त्याने केला. ५२ लाख रुपये दिल्यानंतरही त्याने नुकतेच तुमचे काम झाले आहे. परंतु, एक शेवटचा विधी राहिला आहे, तो तुम्हाला करावा लागेल, असे फिर्यादी यांना सांगितले.

Crime
पुण्यात रुग्ण संख्येत घट; पॉझिटीव्हीटी रेट राज्यापेक्षा जास्त

तर पोलिसांत तक्रार करा :

पवार याने आणखी काही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. कोणीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. पवार याने कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी गुन्हे शाखेकडे माहिती द्यावी, असे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com