esakal | SBI चं ATM पळवणाऱ्या चोरट्यांना राजस्थानात अटक; मंचर पोलिसांची दमदार कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर (ता. आंबेगाव) - येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीनसह रोख रक्कम चोरून नेणाऱ्या चोरट्यांना राजस्थान येथून मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले.

मंचर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीनसह १८ लाख ५३ हजार ८०० रुपयांची रक्कम  चोरुन नेणाऱ्या चार आरोपींना मंचर पोलिसांनी राजस्थान येथुन ताब्यात घेऊन मंचर पोलीस ठाण्यात आणले आहे. अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे यांनी दिली.

SBI चं ATM पळवणाऱ्या चोरट्यांना राजस्थानात अटक; मंचर पोलिसांची दमदार कामगिरी

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर - येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीनसह १८ लाख ५३ हजार ८०० रुपयांची रक्कम  चोरुन नेणाऱ्या चार आरोपींना मंचर पोलिसांनी राजस्थान येथुन ताब्यात घेऊन मंचर पोलीस ठाण्यात आणले आहे. अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंचर येथुन स्टेट बँकेचे एटीएम  ता.२९ जानेवारी रोजी चोरट्यांनी चोरुन नेले होते. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. रोख रक्कम व एटीएम मशीनची किंमत १९ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची फिर्याद बँकेच्या मॅनेजर वंदना पांडे यांनी दिली होती. अलवार (राजस्थान) पोलिसांनी अनवर अमली खां (वय २५, रा. भंगो तावडु, हरियाणा), मुस्ताफा महमुद मेव (वय २३, रा. माचरौली, हरियाणा), तालीम आलीम मेव (वय २६, रा.दौहज, हरियाणा), इरसाद खुरशीद मेव (वय २५, रा.पाली, गोपालगढ, जि.भरतपुर) यांना तेथील एका गुन्ह्याप्रकरणी अटक केली होती. आरोपींनी मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील एटीएम मशीनची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार राजस्थान पोलिसांनी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सागर खबाले, पोलिस जवान विलास साबळे, राजेंद्र हिले, विठ्ठल वाघ, महेश भालेकर, अमर वंजारी, अंकुश मिसाळ, शांताराम सांगडे यांच्या पथकाने राजस्थानला जाऊन आरोपींना मंचरला आणले आहे. दरम्यान, शिरूर व खेड तालुक्यातील एटीएम चोरीशी या चोरट्यांचा संबंध असण्याची शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Edited By - Prashant Patil

loading image