
पुणे : खासगी चालकाला सरकारी गणवेश व सरकारी वाहन उपलब्ध करून देत आपल्या पदाचा गैरवापर करीत वाहनचालकांकडून बेकायदेशीरपणे ‘वसुली’ केल्याचा ठपका मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांच्यावर ठेवण्यात आला. याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी तारांकित प्रश्न मांडून परिवहन विभागाचे धिंडवडे काढले होते. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सचिन पाटील यांच्या विरोधातील सर्व पुरावे सादर केले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन मिळाले असल्याचे परब यांनी सांगितले.