पुण्यातील अतिवृष्टीच्या इशाऱ्याने 'त्या' दोघांनी काढली रात्र जागून

राजेंद्रकृष्ण कापसे 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

रात्रीच्या वेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. आवाजामुळे अचानक इमारत पडेल ती पत्रे उडतील ती कोठे पडतील याची रात्र भर त्यांना होती. त्यानी रात्रभर जागून काढली.

पुणे : स्थळ- टेमघर धरण, वेळ- गुरुवारी  मध्यरात्री एक वाजता ते दोघे जण येथील कार्यालयात रात्रपाळीसाठी आले होते. जेवण करून झोपण्याच्या तयारीत असताना…. अचानक पावसाची संततधारने जोर धरला... वाऱ्याचा वेग नेहमीपेक्षा दुपटीने वाढला… धरण कार्यालयाच्या छतावरील पत्रे वाऱ्याने उचकटले वाऱ्याचा वेग थांबत नव्हता त्यांना अचानक आठवले की, हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा दिलाय. यामुळेच या दोघांमध्ये वाऱ्याच्या वेगात प्रमाणे भीती वाढत गेली आपण दोघे मृत्यूच्या सापळ्यात सापडलं की काय असे त्यांना वाटते मग त्या दोघांनी अतिवृष्टीचा इशारा दिलेली रात्र जागूनच काढली.

असा हा खतरनाक प्रसंग ज्यांच्यावर बेतला ते टेमघर धरणावरील कर्मचारी प्रशांत देशपांडे व शिवाजी कडू यांनी सकाळ शी बोलताना सांगितला. गुरुवारी रात्रपाळीसाठी टेमघर धरणावर आले. याठिकाणी पुण्याहून एक मुक्कामी एसटी येते. साधारण साडेदहा- अकराच्या सुमारास ती एसटी आली. त्याचे चालक वाहक यांनी मिळून जेवण केले.ते गप्पा मारत असताना हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. याठिकाणी नेहमीचा वारा होताच परंतु रात्री एक वाजण्याच्या सुमारास वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला. या ठिकाणी टेमघर प्रकल्पाचे कार्यालय आहे. त्याच्या शेजारील 'पूर निवारण संदेश कक्ष' गेस्ट हाउस आहे.

धरण कार्यालयाच्या इमारतीवर पत्र्याचे छत आहे. तरी इतर दोन्ही इमारती स्लॅबची आहे. रात्री एक नंतर वाऱ्याचा वेग वाढत गेला. शेजारच्या इमारतीवरील पत्र्याचा आवाज वाऱ्यांमुळे करकर वाजत होता. वाऱ्याच्या वेगाने तो पत्र्याचा करकर आवाज देखील वाढत गेला. पावसाचा जोर वाढलेला होता त्यांना अचानक हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे हे आठवले. त्यांच्या मनात वाऱ्याच्या वेगाने भीती अधिक वाढली. आणि अचानक धाडकन असा आवाज आला येऊन पाहतात तर काय, कार्यालयाची पत्रे वाऱ्याने उचकटून नागाचा फणा काढून उभा असतो तसे ते पत्रे उभे होते. त्यांनी कार्यालयात जाऊन काही संगणक आणि कागद नियंत्रण कक्षात हलविली.  पावसाळ्या पूर्वी या पत्राच्या इमारतीवर पावसाचे पाणी गळत असल्याने प्लास्टिक कागद टाकला होता. वाळूची बोचकी भरून ठेवली होती. असे या ठिकाणी भेट दिल्यावर दिसून आले.

रात्रीच्या वेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. आवाजामुळे अचानक इमारत पडेल ती पत्रे उडतील ती कोठे पडतील याची रात्र भर त्यांना होती. त्यानी रात्रभर जागून काढली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scared two employee for alert heavy rain in Pune