पुण्यातील गृहिणी 'बिझी'; जाणून घ्या त्यांची यंदाची दिवाळी कशी आहे

Cooking
Cooking

पुणे : दिवाळी म्हटलं की दाराबाहेर रांगोळी, पणत्या लावणे, खमंग असा फराळ, गोड-धोड जेवण्याच्या पंक्त्या, पूजाअर्चा, आकर्षक सजावट, सणानिमित्त घरात येणाऱ्या नातेवाईकांचे स्वागत अशी जय्यत तयारी असते. मात्र या सगळ्यात तुम्हाला एक निरीक्षण मात्र नक्की दिसेल!! तुम्ही म्हणाल कोणते?. तर ते म्हणजे घरातील महिला, मग ती गृहिणी असो वा नोकरदार ती सदैव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असल्याचे पहायला मिळेल. विशेषकरून गृहिणींचे वेळापत्रक हे सणासुदीला देखील 'बिझी' असल्याचे दिसून येते. गृहिणींची यंदाची दिवाळी कशी आहे?, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

कोरोनाच्या संसर्गाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही महिने लॉकडाउन होता. त्यानंतर हळूहळू अनलॉक करण्यात आले. दरम्यान अनेक कंपन्या आणि विशेषकरून आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आजही हजारो नोकरदार घरातूनच कार्यालयीन काम करत आहेत. त्यामुळे घरातील मंडळी एकत्रित असल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना गृहिणी व्यक्त करत आहेत.
पूजा वानखेडे म्हणाल्या, "दरवर्षी दिवाळीतही कामाची गडबड असते. परंतु यंदा घरातील नोकरदार मंडळी निवांत आहेत. त्यामुळे दिवाळीचा आनंद वाढला आहे. पण घरात सगळे असल्याने मोठ्यांसह बच्चे कंपनीकडून खाण्याच्या पदार्थांच्या फर्माईशी होत आहेत."

घरात कामाचा ताण नको म्हणून गेल्या काही वर्षांपासून आयता फराळ अनेकांच्या घरी मागविला जातो. "यंदा मात्र चित्र काहीसे बदले असल्याचे पाहायला मिळाले. बाहेरुन फराळ मागविणे सुरक्षित वाटत नसल्याने यंदा आम्ही घरीच फराळ केला. दररोज एक नवीन पदार्थ, रांगोळ्यांच्या पायघड्या, आकर्षक सजावट हे सगळे करण्यात दिवस कसा जातो, हेच कळत नाही," असे चेतना पवार यांनी सांगितले.

दिवाळी म्हटलं की भरपूर खरेदी हे समीकरण ठरलेलेच आहे. तसेच दिवाळी म्हटलं की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तुडूंब गर्दी होणारच. एरवी या गर्दीतून वाट काढत शॉपिंग करण्याची मजा काही औरच असते. परंतु यंदा कोरोनाच्या काळात अशी गर्दी होणे, म्हणजे बापरे!! घराबाहेर पडायलाच भीती वाटते. त्यामुळे यंदा खरेदीसाठी अनेक महिलांनी घराबाहेर पडणे टाळले. नूतन गुरव म्हणाल्या, "खरेदीसाठी गर्दीत जाण्यापेक्षा ऑनलाइन खरेदीला यंदा प्राधान्य दिले. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी गर्दीच्या ठिकाणी जाणे यंदा टाळले आहे. त्यामुळे मुलींच्या मदतीने पहिल्यांदाच ऑनलाइन खरेदी केली आहे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com