इंजिनिअरिंग करायचंय? या आहेत शिष्यवृत्ती

इंजिनिअरिंग करायचंय? या आहेत शिष्यवृत्ती

सध्याचे युग हे झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे. शासनातर्फे सुरू झालेल्या डिजिटल इंडिया, इन इंडिया स्टार्ट अप इंडिया या योजनांमुळे अभियांत्रिकीचे आयाम आता विस्तारले आहे. आतापर्यंत अभियांत्रिकी क्षेत्र हे त्या विभाग व शाखा यापुरते मर्यादित होते, पण आता विकसित राष्ट्रांमधील नामांकित विद्यापीठांच्या पार्श्वभूमीवर भारतातही आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन विकसित होत आहे. 

अभियांत्रिकी शिक्षण आता पारंपरिक तंत्रज्ञानासोबतच समकालीन, नव्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्याचे धडे ही देत आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे सर्वसमावेशक आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही कारण विषयाचे मूलभूत ज्ञान, शोधबुद्धी, परस्पर सहकार्य वृत्ती, स्वयंप्रेरणा, व्यवस्थापन कौशल्य, एकात्म, सर्वंकष विचार करण्याची सवय, नवनिर्मितीचा ध्यास ह्या पैकी बरेच गुण आणि कौशल्य ह्या शिक्षणाने आत्मसात होतात. अशा ह्या सर्वसमावेशक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतांना मात्र वाढत्या शुल्काचा विचार करून काही होतकरू मुले नाइलाजाने अभियांत्रिकी सोडून इतर शाखांकडे वळताना दिसून येतात पण इतर शाखांना प्रवेश घेण्यापूर्वी मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती आणि सुविधा सोडून इतर उपयोगी आणि महत्त्वाच्या  असणाऱ्या विविध शिष्यवृत्तीची तुम्ही माहिती घेतली आहे का? अभियांत्रिकी शिक्षण सुकर करणाऱ्या काही शासकीय, खासगी कंपन्या व समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मिळणाऱ्या काही शिष्यवृत्ती आणि योजनांची माहिती 
घेऊ या.  

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क 
शिष्यवृत्ती योजना. 

     राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्टया मागासप्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना (व्यवस्थापन कोटयातील प्रवेशित विद्यार्थी वगळून) शिक्षण शुल्काच्या आणि परीक्षा शुल्काच्या ५० टक्के इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते. अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या. 
    https://mahadbtmahait.gov.in/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A1DB822FC15D61FEA

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह  निर्वाहभत्ता योजना  
 ज्या विद्यार्थ्यांचे पालक सक्षम प्राधीकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता सदर योजना आहे. वसतिगृह निर्वाहभत्ता (Hostel Maintenance Allowance) प्रति विद्यार्थी प्रतिमहा : 
 महानगरांतील (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर) प्रवेशित विद्यार्थी-रुपये ३०००/- 
 राज्यातील अन्य ठिकाणी प्रवेशित विद्यार्थी- रुपये २०००/- 
 ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रु. १.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, 
अशा विद्यार्थ्यांना प्रचलित व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांकरिता रु. ३०००/- निर्वाह भत्ता अदा करण्यात येईल. 
 www.dte.org 

जिल्हा परिषद स्कॉलरशिप 

खुल्या प्रवर्गातील प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षकांच्या मुलांसाठी रुपये ४००० शिष्यवृत्ती.
 अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 

 अल्पसंख्याक प्रवर्गात (मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्‍चन, शीख, जैन) असणाऱ्या आणि कुटुंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना रुपये २५०००. 
 www.dte.org

केंद्रीय विभाग शिष्यवृत्ती 

 कुठल्याही प्रवर्गातील विद्यार्थी ज्याला ८०%च्या वर गुण आहे त्याला रुपये १०००० ची शिष्यवृत्ती मिळते. 

एनएचएफडीसी शिष्यवृत्ती 

केंद्र सरकारच्या अपंग विद्यार्थी विकास मंत्रालयातर्फे पात्रताधारक अपंग विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. 
 या योजनेंतर्गत २५०० शिष्यवृत्त्या दिल्या जातात त्यापैकी ३०% महिला उमेदवारासाठी राखीव आहे. 
 कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी - 
http://nhfdc.nic.in/site/Trust_fund 

डॉ. प्रदीप माने, प्रिन्सिपल, ए.आय.एस.एस.एम.एस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com