शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आतापर्यंत साडे सहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship Exam
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आतापर्यंत साडे सहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आतापर्यंत साडे सहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा (Maharashtra State Council Of Examination) परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२२मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी (Fifth) आणि आठवीच्या शिष्यवृत्ती (scholarship) परीक्षेसाठी आतापर्यंत जवळपास सहा लाख ८९ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यातील सुमारे सहा लाख ४६ हजार ३३८ विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज (आवेदनपत्र) करण्याची प्रक्रिया ३१ डिसेंबरला बंद झाली असून अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

हेही वाचा: महिलांच्या तक्रारीनंतर 'त्या' मोबाईल ऍपबाबत गुन्हा दाखल : वळसे पाटील

राज्यातील शासनमान्य शाळांमधून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी २०२२मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली आहे. राज्यातील ४५ हजार तीन शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिंनींची संख्या तुलनेने जास्त आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एक लाख ९६ हजार ५६३ विद्यार्थिनींनी, तर आठवीच्या परीक्षेसाठी एक लाख ५१ हजार ३१ विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे.

ही शिष्यवृत्ती परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे. या परीक्षेबाबत सविस्तर माहिती परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: भाजपचे विधानपरिषदेतील आमदार आर एन सिंह यांचं निधन

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ :

  • - तपशील : इयत्ता पाचवी : इयत्ता आठवी

  • - नोंदणी केले एकूण विद्यार्थी : ३,९७,८०१ : २,९१,९५५

  • - अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेले विद्यार्थी : ३,७४,६११ : २,७१,७२७

  • - अर्ज प्रलंबित असलेले विद्यार्थी : २३,१९० : २०,२२८

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ करिता नोंदणी केलेल्या मुला-मुलींची संख्या :

  • तपशील : इयत्ता पाचवी : इयत्ता आठवी

  • विद्यार्थी : १,७८,०४८ : १,२०,६९६

  • विद्यार्थिंनी : १,९६,५६३ : १,५१,०३१

  • एकूण : ३,७४,६११ : २,७१,७२७

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top