'मुलींच्या चेहऱ्यावरील हास्याने प्रोत्साहन'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

फिक्की फ्लो संस्थेमार्फत मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करता आली, याचा मला आनंद आहे. मुलींच्या चेहऱ्यावर फुललेल्या स्मित हास्याने मला प्रोत्साहन मिळाले.

पुणे - ‘‘फिक्की फ्लो संस्थेमार्फत मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करता आली, याचा मला आनंद आहे. मुलींच्या चेहऱ्यावर फुललेल्या स्मित हास्याने मला प्रोत्साहन मिळाले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे असून, त्यासाठी ‘फिक्की फ्लो’सारख्या संस्था प्रयत्नशील आहेत, याचा आनंद वाटतो,’’ असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी धोनी हिने केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन (फिक्की फ्लो) संस्थेच्या वतीने साक्षी हिच्याशी संवाद कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. इंदिरा कॉलेजचे संचालक चेतन वाकळकर यांनी साक्षी हिची मुलाखत घेतली. या वेळी कृषी विद्यालयामार्फत सहा बी.एससी. (कृषी); तर लीला पूनावाला फाउंडेशनमार्फत चार बी.एससी. (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, ‘फ्लो’च्या सदस्या अनिता सणस आदी उपस्थित होते. 

छाब्रिया म्हणाल्या, ‘‘गेल्या पाच वर्षांत संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत. शहरातून खेड्याकडे ही या वर्षीची मध्यवर्ती कल्पना आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील महिलांच्या आयुष्याचा स्तर उंचावणे, त्यांच्या हातांना काम देणे, त्यांना सशक्त करणे, रोजगार देणे ही त्यामागची उद्दिष्टे आहेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scholarship for girls education through FICCI Flow organization