उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

अधिक माहितीसाठी संपर्क - (020) - 24405894/95/97. 
ई-मेल - sakalindiafoundation@esakal.com. 

पात्र विद्यार्थ्यांना अर्जाचा छापील नमुना देण्याची अंतिम तारीख - 31 मे 2018 
संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - 15 जून 2018 

पुणे - हीरक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणारे "सकाळ इंडिया फाउंडेशन' उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वार्षिक शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज मागवीत आहे. फाउंडेशनतर्फे पंचावन्न भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी 60 हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. 

देशाबाहेरील विद्यापीठ वा संशोधन संस्थेकडून 2018-19 या शैक्षणिक वर्षात किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र मिळालेले भारतीय विद्यार्थी किंवा 2016 अथवा त्यापूर्वी भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. या बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीच्या रकमेची परतफेड दोन वर्षांत करावयाची असते. 

वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित पीएच.डी.साठी संशोधन करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल. 

अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश दिल्याबद्दलच्या पत्राची छायांकित प्रत व स्वत-चा पत्ता लिहिलेल्या 11 सेंमी बाय 24 सेंमी आकाराच्या पाकिटावर 10 रुपयांचे टपाल तिकीट लावून ते कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ कार्यालय, 595, बुधवार पेठ, पुणे- 411 002 या पत्त्यावर पाठवावे. विनंतीपत्र पाठविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्जाचा नमुना इतर जोडपत्रांसह 31 मेपर्यंत पाठविला जाईल किंवा "सकाळ'च्या 595, बुधवार पेठ, पुणे येथील कार्यालयात सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत प्रत्यक्षात देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे संपूर्ण भरलेले अर्ज 15 जूनपर्यंतच "सकाळ'च्या पुणे कार्यालयात स्वीकारले जातील. 

अधिक माहितीसाठी संपर्क - (020) - 24405894/95/97. 
ई-मेल - sakalindiafoundation@esakal.com

पात्र विद्यार्थ्यांना अर्जाचा छापील नमुना देण्याची अंतिम तारीख - 31 मे 2018 
संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - 15 जून 2018 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scholarship for Higher Education Students Sakal India Foundation