School Admission : शाळा प्रवेशासाठी लगबग; इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती

अश्विनी असो वा प्रसाद यांच्यासारखे असंख्य पालक आपल्या पाल्यांसाठी अगदी चोखंदळपणे शाळा निवडताना दिसत असल्याचे पाहायला मिळते.
Admission
Admissionesakal

पुणे - पालक क्रमांक एक

अश्विनी पाटील (नाव बदललेले आहे)

‘भविष्याचा विचार करता, मुलांना संतुलित आणि शाश्वत शिक्षण मिळावे, जागतिक स्तरावर ओळखले जाणारे शिक्षण मिळावे म्हणून माझी मुलगी रिया हिच्यासाठी मी आयबी किंवा आयसीएसई स्कूल पाहत होते. परंतु अंतिमतः आयसीएसई शाळेत प्रवेश घेत आहे.’

पालक क्रमांक दोन

प्रसाद अत्रे (नाव बदललेले आहे)

‘चांगले शिक्षण याला मी प्राधान्य देतो, म्हणून मी मराठी माध्यमाची प्रयोगशील शिक्षण शाळा निवडली आहे. अर्थात, पुण्यात अशा मोजक्याच शाळा असून त्यातील प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते. इंग्रजी भाषेचे म्हणाल, तर ती केवळ भाषा असून मातृभाषा आली की अन्य भाषा शिकणे सोपे जाते.’

अश्विनी असो वा प्रसाद यांच्यासारखे असंख्य पालक आपल्या पाल्यांसाठी अगदी चोखंदळपणे शाळा निवडताना दिसत असल्याचे पाहायला मिळते. अर्थात, शहरातील सर्व शाळांमधील प्रवेशाची ७० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या अंतिम टप्प्यातील प्रवेश सुरू आहेत. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरपासून शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते. जूनच्या सुरुवातीपर्यंत प्रवेशाची ही प्रक्रिया सुरू राहते.

शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह मराठी माध्यमांच्या शाळांमधील प्रवेशाची प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच सुरू होते. तर शहराच्या मध्यवर्ती भागात अनुदानित आणि मोजक्याच नामांकित खासगी शाळा असून त्यात प्रवेश मिळावा, म्हणून पालक जानेवारीपासूनच चौकशी करू लागतात. तर, शहराच्या उपनगरांमधील खासगी शाळांमधील प्रवेशाची प्रक्रिया मे-जूनपर्यंत सुरू राहते.

अद्ययावत आणि काळाशी सुसंगत अभ्यासक्रम, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर मानांकित असा अभ्यासक्रम असणे, याशिवाय सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात इंग्रजी, विज्ञान, गणितासह; शाळांमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्यांना असणारे विशेष महत्त्व यामुळेही पालक या शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेण्यास इच्छुक असल्याचे दिसून येते.

महागड्या शाळांकडे पालक का वळतात?

 • पाल्याने सुविधांनी सुसज्ज अशा सर्वाधिक आधुनिक शाळेत शिकावे, अशी अपेक्षा

 • डिजिटल क्लासरूम, प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षणावर भर

 • शिक्षणाबरोबरच अन्य कौशल्य शिकण्याला महत्त्व

शाळा प्रवेशातील सध्याचे ‘ट्रेंड’

 • खासकरून आयबी, आयसीएसई, सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशास इच्छुक

 • अनुदानित शाळांमधील शुल्क कमी असले, तरी महागड्या खासगी शाळांकडे ओढा

 • भविष्यात परदेशात जाण्याची संधी मिळेल, म्हणून होतीय आयबी, आयसीएसई शाळांची निवड

 • केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाची होतीय चौकशी

शाळांच्या शुल्काचा आलेख (अंदाजे)

 • १५,००० ते ३५,००० रुपये - सर्वसाधारण (बजेट) शाळा

 • ३६,००० ते ७०,००० रुपये - मध्यम शाळा

 • ७०,००० ते ८५,००० रुपये - उच्चभ्रू शाळा

 • ९०,००० ते २,९५,००० रुपये - अति उच्चभ्रू शाळा

सरकारी आणि अनुदानित शाळांच्या तुलनेत पालकांची पसंती खासगी शाळांना सर्वाधिक आहे. त्यातही सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या शाळांना पालक प्राधान्य देत आहेत. पाल्यासाठी शाळा निवडताना शाळांमधील पायाभूत सुविधा, शिक्षकांची शिकविण्याची पद्धत, अत्याधुनिक सुविधा, पाल्यांच्या कौशल्यांना मिळणारे प्राधान्य हे पालक आवर्जून पाहत आहेत.

- दीपाली सरदेशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ (पुणे)

पुण्यातील शाळांची संख्या

 • विद्यार्थी संख्या - ९८,७०९ - ३,००,००० - २,००,०००

 • शाळांची संख्या - ३०९ - ४६९ - ३१५

 • शाळांचे प्रकार - सरकारी शाळा - खासगी (विनाअनुदानित) शाळा - अनुदानित शाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com